म्हाडा नागपूर मंडळाच्या १५१४ सदनिका विक्रीची सोडत जाहीर
अर्ज नोंदणीस उद्यापासून सुरवात ; १९ जुलैपासून अर्ज स्वीकृती
मुंबई,
दि. १७ जुलै २०१८ :- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या
(म्हाडाचा विभागीय घटक) अखत्यारीतील विविध गृह प्रकल्पांतर्गत १५१४
सदनिकांच्या विक्रीची सोडत जाहीर करण्यात आली असून संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणीच्या प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या आयोजित करण्यात आला आहे .
माननीय मुख्यमंत्री यांच्या नागपूर येथील रामगिरी या शासकीय निवासस्थानी
हा कार्यक्रम होणार आहे. सदर सोडतीत सहभागी होण्याकरिता अर्जदारांना दि.
१८ जुलै २०१८ दुपारी दोन वाजेपासून अर्ज नोंदणी करता येणार असून नोंदणीकृत
अर्जदारांना ऑनलाईन अर्ज दि. १९ जुलै २०१८ रोजी दुपारी दोन
वाजेपासून भरता येणार आहे. अर्ज नोंदणीकरिता दि. ८ ऑगस्ट रात्री ११.५९
वाजेपर्यंत अंतिम मुदत असणार आहे तसेच अर्ज स्वीकृतीची अंतिम मुदत ९ ऑगस्ट
२०१८ रात्री ११.५९ वाजेपर्यंत असणार आहे.
सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प
व
मध्यम उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित
उत्पन्न) रु. २५,०००/ पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,००१ ते
रु. ५०,००० पर्यंत व मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,००१ ते रु. ७५,०००
पर्यंत सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्जासोबत भरावयाची अनामत
रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता रु.
५,४४८/- प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता रु. १०,४४८ प्रति अर्ज, मध्यम
उत्पन्न गटाकरिता रु. १५,४४८ प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन
अर्जापोटी प्रतिअर्ज रु. ४४८ (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे.
सोडतीची विस्तृत माहिती https://lottery.mhada.g ov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी नागपूर येथील वांजरा, बेलतरोडी, चिखली
देवस्थान, चंद्रपूर येथील नवीन, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि नागपूर
येथील छाभा (एसडीपीएल ) यांचा प्रकल्प येथील एकूण १३४७ सदनिकांचा सोडतीत
समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता वांजरा आणि
नागपूर येथील छाभा (एसडीपीएल )
येथील एकूण ७७ सदनिकांचा
समावेश आहे. तर मध्यम उत्पन्न गटाकरिता नागपूर येथील चिखली देवस्थान, आणि नवीन , चंद्रपूर येथील एकूण ९० सदनिकांचा
सोडतीत समावेश आहे.
सदनिकांच्या वितरणासाठी
म्हाडाने
कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट म्हणून नेमलेले नाही.
अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये. तसे केल्यास
नागपूर मंडळ / म्हाडा कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही.
No comments:
Post a Comment