धारावी सेक्टर - ५ पुनर्विकास प्रकल्प
"म्हाडा"तर्फे २१ पात्र झोपडीधारकांना सदनिकांचे वाटप
मुंबई, दि. ०८ जानेवारी २०१८ :- मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास
मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५
मध्ये उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीतील पुनर्वसन सदनिकांचे धारावीतील
क्लस्टर जे मधील २१ निवासी पात्र झोपडीधारकांना आज चिट्ठी पद्धतीने सोडत
काढून वाटप करण्यात आले.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील गुलझारीलाल नंदा सभागृहात आयोजित या सोडतीला मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सहमुख्य अधिकारी श्री. संजय भागवत, उपमुख्य अधिकारी श्री. टी. पी. राठोड, उपनिबंधक श्री. राजेंद्र गायकवाड, सहकारी अधिकारी श्री. आर. बी. जाधव, सक्षम प्राधिकारी श्रीमती भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी पात्र झोपडीधारकांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका वाटप करावयाची यासंदर्भात चिट्ठी काढून निर्णय घेण्यात आला. सदर सदनिकांचा ताबा पात्र झोपडीधारकांना लवकरच दिला जाणार आहे. सदर इमारतीत ३०० चौरस फुटाच्या (कार्पेट) ३५८ सदनिका आहेत. मे-२०१६ मध्ये २६६ पात्र निवासी झोपडीधारकांना तसेच ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना मार्च-२०१७ मध्ये पुनर्वसन सदनिकेचा ताबा देण्यात आला आहे.

---
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ मध्ये उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीतील पुनर्वसन सदनिकेचे वाटप पात्र झोपडीधारक श्रीमती विजया शिंदे यांना करतांना सहमुख्य अधिकारी श्री. संजय भागवत. समवेत उपमुख्य अधिकारी श्री. टी. पी. राठोड, मिळकत व्यवस्थापक श्री. प्रमोद कांबळे आदी.
-------
No comments:
Post a Comment