Monday, 5 May 2014


दि. ६ मे २०१४ रोजीच्या पुढारी (मुंबई आवृत्ती) वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी. 

म्हाडाच्या घरासाठी देव, संत महात्म्यांना साकडे 

घर म्हणजे आपलं माणूस,
जे नेहमी फक्त आपलाच विचार करतं.
घर म्हणजे त्या वस्तू,
ज्या प्रसन्गी सजीव होऊन
आपला एकटेपणा दूर करतात.
घर म्हणजे चार प्रेमाचे शब्द,
जे आपल्याला आपुलकीची ऊब देतात...


स्वतःचे छान घरकुल असावे, हे प्रत्येक मनुष्याचे स्वप्न असते. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) सदनिका सोडत-२०१४ च्या द्वारे मुंबई,  विरार व कोंकणातील वेंगुर्ला येथे २६४१ घरे उपलब्ध करून दिली आहेत. त्यासाठी नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. अर्ज भरताना अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करणे गरजेचे आहे. मात्र, काही अर्जदारांनी घर आपल्याला लागावे म्हणून चक्क देवांची, संत महात्म्यांची छायाचित्रे आपापल्या अर्जात अपलोड केली आहेत. स्वप्नातले घरकुल मिळण्यासाठी अर्जदारांनी देवालाच, संत महात्म्यांच  अर्जदार करून टाकले आहे. मात्र, सदर अर्जदारांनी तातडीने अर्जामध्ये ज्यांच्या नावाने अर्ज केला असेल त्यांचे स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. तसे न केल्यास त्यांचा अर्ज बाद होऊ शकतो.

No comments:

Post a Comment