Thursday 1 May 2014


म्हाडाच्या "एकात्मिक लॉटरी व्यवस्थापन प्रणाली" या प्रकल्पाला "ई प्रशासनाच्या सहाय्याने नागरी केंद्रात सुविधांचे उत्कृष्ट प्रदान" या प्रवर्गात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सुवर्ण पदक स्वीकारताना म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सतीश गवई, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सहमुख्य अधिकारी श्री. दिनकर जगदाळे, म्हाडाच्या आयसीटी विभागाचे श्री. अनिल अंकलगी. समवेत आयसीटी विभागाचे अधिकारी श्री. सचिन वडगाये, श्रीमती सविता बोडके, श्री. हेमंत जोगी, श्री. संदीप बोदेले, श्री. सुभाष कुमरे आदी.
----

म्हाडाच्या "एकात्मिक लॉटरी व्यवस्थापन प्रणाली" प्रकल्पाला राज्य शासनातर्फे सुवर्णपदक

मुंबई, दि. १ मे २०१४ :- महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयातर्फे  "राज्य ई प्रशासन पुरस्कार-२०१३" चे आज थाटामाटात वितरण करण्यात आले. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) "एकात्मिक लॉटरी व्यवस्थापन प्रणाली" हा प्रकल्प  "ई प्रशासनाच्या सहाय्याने नागरी केंद्रात सुविधांचे उत्कृष्ट प्रदान" या प्रवर्गात सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सतीश गवई, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सहमुख्य अधिकारी श्री. दिनकर जगदाळे, म्हाडाच्या आयसीटी विभागाचे श्री. अनिल अंकलगी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
     सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर श्री. स्वाधीन क्षत्रिय (अप्पर मुख्य सचिव, महसूल), श्री. राजेश अग्रवाल (प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान संचालनालय), श्री. के. पि. बक्षी (अप्पर सचिव, नियोजन), श्री. वीरेंद्र सिंग (संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय) आदी उपस्थित होते.
     पारदर्शक कार्यप्रणाली, उत्कृष्ट सेवा, कार्यकुशलता, कमी जोखमीचे आणि राष्ट्रीय संपत्ती असणाऱ्या कागदाचा कमी वापर हे या प्रणालीचे उद्दीष्ट  आहे. गेल्या दशकात म्हाडाने सुमारे ३० हजार घरांचे वितरण सोडत प्रक्रियेद्वारे केले आहे. परवडणार्या दरातील म्हाडाच्या सदनिकांसाठी लाखो अर्ज प्राप्त होत असतात. या सोडतीविषयीची  माहिती तसेच पारदर्शक व बिनचूक सोडत घडवून आणण्यासाठी म्हाडाला या प्रणालीचा खूप फायदा होत आहे.


No comments:

Post a Comment