Wednesday 28 May 2014

म्हाडा सदनिका सोडत - २०१४ साठी अजून अर्ज केला नसेल तर इच्छुक अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ;
 
* सोडतीसाठी अर्ज करण्याकरिता आता ९ जुन २०१४ पर्यंत मुदत.
*
 
 
 


Monday 5 May 2014


दि. ६ मे २०१४ रोजीच्या पुढारी (मुंबई आवृत्ती) वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी. 

म्हाडाच्या घरासाठी देव, संत महात्म्यांना साकडे 

घर म्हणजे आपलं माणूस,
जे नेहमी फक्त आपलाच विचार करतं.
घर म्हणजे त्या वस्तू,
ज्या प्रसन्गी सजीव होऊन
आपला एकटेपणा दूर करतात.
घर म्हणजे चार प्रेमाचे शब्द,
जे आपल्याला आपुलकीची ऊब देतात...


स्वतःचे छान घरकुल असावे, हे प्रत्येक मनुष्याचे स्वप्न असते. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) सदनिका सोडत-२०१४ च्या द्वारे मुंबई,  विरार व कोंकणातील वेंगुर्ला येथे २६४१ घरे उपलब्ध करून दिली आहेत. त्यासाठी नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. अर्ज भरताना अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करणे गरजेचे आहे. मात्र, काही अर्जदारांनी घर आपल्याला लागावे म्हणून चक्क देवांची, संत महात्म्यांची छायाचित्रे आपापल्या अर्जात अपलोड केली आहेत. स्वप्नातले घरकुल मिळण्यासाठी अर्जदारांनी देवालाच, संत महात्म्यांच  अर्जदार करून टाकले आहे. मात्र, सदर अर्जदारांनी तातडीने अर्जामध्ये ज्यांच्या नावाने अर्ज केला असेल त्यांचे स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. तसे न केल्यास त्यांचा अर्ज बाद होऊ शकतो.

म्हाडातर्फे पैठणच्या १६० सदनिका विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध   



महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा विभागीय घटक असलेल्या औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे भूखंड क्र. आर - १, एम. आय. डी. सी., ता. पैठण, जिल्हा - औरंगाबाद येथे अल्प उत्पन्न गटातील १६० सदनिकांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कृपया अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://mhada.maharashtra.gov.in/sites/default/files/website_(3.5.14).pdf

Saturday 3 May 2014




म्हाडा सदनिका सोडत - २०१४ च्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. सदर माहिती इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये उपलबद्ध आहे. मराठीतुन माहितीसाठी संकेतस्थळाच्या उजव्या कोपऱ्यात दिलेल्या "मराठी"वर क्लिक करा. https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/


Friday 2 May 2014

महाराष्ट्र स्थापनेच्या चोपन्नाव्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई येथील मुख्यालयात ध्वजारोहण करताना म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सतीश गवई. 
 


ध्वजाला मानवंदना देताना पोलिस अधिकारी-कर्मचारी.


समारंभाला उपस्थित म्हाडातील अधिकारी-कर्मचारी.

Thursday 1 May 2014


म्हाडाच्या "एकात्मिक लॉटरी व्यवस्थापन प्रणाली" या प्रकल्पाला "ई प्रशासनाच्या सहाय्याने नागरी केंद्रात सुविधांचे उत्कृष्ट प्रदान" या प्रवर्गात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सुवर्ण पदक स्वीकारताना म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सतीश गवई, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सहमुख्य अधिकारी श्री. दिनकर जगदाळे, म्हाडाच्या आयसीटी विभागाचे श्री. अनिल अंकलगी. समवेत आयसीटी विभागाचे अधिकारी श्री. सचिन वडगाये, श्रीमती सविता बोडके, श्री. हेमंत जोगी, श्री. संदीप बोदेले, श्री. सुभाष कुमरे आदी.
----

म्हाडाच्या "एकात्मिक लॉटरी व्यवस्थापन प्रणाली" प्रकल्पाला राज्य शासनातर्फे सुवर्णपदक

मुंबई, दि. १ मे २०१४ :- महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयातर्फे  "राज्य ई प्रशासन पुरस्कार-२०१३" चे आज थाटामाटात वितरण करण्यात आले. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) "एकात्मिक लॉटरी व्यवस्थापन प्रणाली" हा प्रकल्प  "ई प्रशासनाच्या सहाय्याने नागरी केंद्रात सुविधांचे उत्कृष्ट प्रदान" या प्रवर्गात सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सतीश गवई, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सहमुख्य अधिकारी श्री. दिनकर जगदाळे, म्हाडाच्या आयसीटी विभागाचे श्री. अनिल अंकलगी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
     सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर श्री. स्वाधीन क्षत्रिय (अप्पर मुख्य सचिव, महसूल), श्री. राजेश अग्रवाल (प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान संचालनालय), श्री. के. पि. बक्षी (अप्पर सचिव, नियोजन), श्री. वीरेंद्र सिंग (संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय) आदी उपस्थित होते.
     पारदर्शक कार्यप्रणाली, उत्कृष्ट सेवा, कार्यकुशलता, कमी जोखमीचे आणि राष्ट्रीय संपत्ती असणाऱ्या कागदाचा कमी वापर हे या प्रणालीचे उद्दीष्ट  आहे. गेल्या दशकात म्हाडाने सुमारे ३० हजार घरांचे वितरण सोडत प्रक्रियेद्वारे केले आहे. परवडणार्या दरातील म्हाडाच्या सदनिकांसाठी लाखो अर्ज प्राप्त होत असतात. या सोडतीविषयीची  माहिती तसेच पारदर्शक व बिनचूक सोडत घडवून आणण्यासाठी म्हाडाला या प्रणालीचा खूप फायदा होत आहे.