म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील भाडेकरू / रहिवाशांकरिता अभय योजना
संपूर्ण थकीत भाडे विहित मुदतीत भरल्यास व्याजावर मिळणार सवलत
मुंबई, दि. ३ फेब्रुवारी, २०२१ :- कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लागू टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर झालेल्या विपरीत परिणामांची बाब विचारात घेऊन म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील २१ हजार १४९ संक्रमण शिबिर गाळ्यांमधील भाडेकरू/ रहिवाशी यांच्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संक्रमण शिबिर गाळ्यांमधील भाडेकरू / रहिवाशी यांनी प्रलंबित/थकीत संपूर्ण भाडे विहित मुदतीत भरल्यास निव्वळ व्याजावर सवलत देण्याचा निर्णय मंडळामार्फत घेण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती श्री. विनोद घोसाळकर यांनी आज दिली.
यावेळी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. अरुण डोंगरे उपस्थित होते.
श्री. घोसाळकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, माननीय गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सदर योजना जाहीर करण्यात आली आहे.

सदर योजना दोन टप्प्यांत लागू केली जाणार असून ही योजना फेब्रुवारी-२०२१ व मार्च -२०२१ या दोन महिन्यांमध्ये लागू राहणार आहे.
पहिल्या टप्प्यांतर्गत संक्रमण शिबिर गाळ्यातील भाडेकरू/रहिवाशी यांनी दि. २८ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत संपूर्ण थकीत भाडे रकमेची मुद्दल भरल्यास एकूण व्याजामध्ये ६० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत संक्रमण शिबिर गाळ्यातील भाडेकरू/रहिवाशी यांनी दि. ३१ मार्च, २०२१ पर्यंत संपूर्ण थकीत भाडे रकमेची मुद्दल भरल्यास एकूण व्याजामध्ये ४० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबीर गाळ्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरू / रहिवाशी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात भाडे व त्यावरील व्याजापोटी एकूण रु. १२९.९२ कोटी रक्कम थकीत आहे. या योजनेअंतर्गत जे भाडेकरू रहिवाशी संपूर्ण थकित रक्कम भरतील त्यांनाच ही सवलत लागू राहील.

No comments:
Post a Comment