Wednesday, 30 November 2016

सेवानिवृत्तीच्या दिवशीच कर्मचाऱ्यांना धनादेश देण्याचा "म्हाडा"चा उपक्रम स्तुत्य - श्री. प्रकाश मेहता  

मुंबईदि. ३० नोव्हेंबर २०१६ : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मधील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीच्याच दिवशी सत्कार करून त्यांना रजा उपदान व रजा रोखीकरणाचीही रक्कम धनादेशाद्वारे देण्याचा म्हाडा प्रशासनाने सुरु केलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. प्रकाश मेहता यांनी केले.
     महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात  सेवानिवृत्त अधिकारी - कर्मचारी यांच्या आज आयोजित निरोप समारंभप्रसंगी श्री. मेहता बोलत होते. श्री. मेहता यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना म्हाडाचे स्मृतिचिन्हशाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. संभाजी झेंडेसचिव डॉ. बी. एन. बास्टेवाड आदी उपस्थित होते.
    श्री. मेहता म्हणाले कीआयुष्याचा सर्वात मोठा काळ व्यक्ती आपल्या कार्यालयात व्यतीत करते. सरासरी ३५ ते ४० वर्षाचे योगदान एखादी व्यक्ती त्या संस्थेला देते. अशा वेळी संस्थेने देखील त्यांच्या योगदानाचे मूल्य ओळखून या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचा दिवस अविस्मरणीय करणे गरजेचे आहे. या दृष्टीने म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. संभाजी झेंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम म्हाडातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना समाधान देऊन जाणारा व त्यांच्या दृष्टीने अविस्मरणीय ठरणारा आहे. 
     आज सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये श्री. एम. ए. रासकर(उपअभियंता)श्रीमती ए. व्ही. जोशी (सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ)श्रीमती आर. एस. मदन (सहाय्यक)श्रीमती एल. जे. कांबळे (नाईक) यांचा समावेश आहे. म्हाडाने डिसेंबर-२०१५ पासून दर महिन्याला सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी रजा उपदान व रजा रोखीकरणाचीही रक्कम धनादेशाद्वारे देण्याचा तसेच त्यांना म्हाडाचे स्मृतिचिन्हशाल व श्रीफळ देऊन गौरवण्याचा उपक्रम सुरु केला आहे.
----

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. प्रकाश मेहता. समवेत म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. संभाजी झेंडे, सचिव डॉ. बी. एन. बास्टेवाड, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीमती वैशाली संदानसिंग आदी.   


Friday, 18 November 2016

गिरणी कामगार सोडत - २०१६
म्हाडामार्फत दोन डिसेंबरला एमएमआरडीएने बांधलेल्या २४१७ सदनिकांची सोडत    
    

मुंबई, दि. १८ नोव्हेंबर २०१६ : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पनवेल तालुक्यातील मौजे कोन येथील २४१७ सदनिकांची संगणकीय सोडत गिरणी कामगारांकरिता दि. २ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी दहा वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे.              
  
एमएमआरडीएतर्फे बांधण्यात आलेल्या प्रत्येकी १६० चौरस फुटाच्या दोन सदनिका (परिस्थितीनुरूप शक्य असलेली जोडघरे) या प्रकारे प्रत्येकी एका युनिटसाठी सहा लाख रुपये आकारून गिरणी कामगारांना वितरित करण्यात येणार आहे. सोडत प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेल्या गिरणी कामगार / वारस यांची माहिती म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर सोडतीमध्ये म्हाडाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या १,४८,७११ गिरणी कामगार / वारस यांच्या यादीमधून सन २०१२ च्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले अर्जदार , सन २०१२ च्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांपैकी अंतिमतः अपात्र झालेल्या अर्जदारांऐवजी कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमधील अर्जदार तसेच म्हाडाच्या मे - २०१६ च्या सोडतीतील यशस्वी अर्जदार या सोडतीतून वगळण्यात येऊन उर्वरित अर्जदारांचा या सोडत प्रक्रियेत समावेश राहील. 

स्वान मिल कुर्ला / शिवडी या मिलच्या अर्जदारांना मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून या सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात येईल.        
म्हाडाकडे १६ नोव्हेंबरपर्यंत तीन कोटी एक्क्यांशी लाख रुपये थकबाकी जमा

५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा २४ नोव्हेंबरपर्यंत थकबाकी जमा करण्यासाठी वापरता येणार      

मुंबईदि. १८ नोव्हेंबर २०१६ : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ व मुंबई  इमारत दुरुस्ती  व पुनर्रचना मंडळांच्या अखत्यारीत  असलेल्या वसाहतींमधील संस्थासदनिकाभूखंडांची थकबाकी वसुली अंतर्गत दि. १२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान तीन कोटी एक्क्यांशी लाख रुपये थकबाकी जमा झाली आहे. शासनातर्फे जुन्या नोटांव्दारे थकबाकी वसुलीकरिता दि. २४ नोव्हेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांव्दारे थकबाकी वसुल करण्याकरिता महाराष्ट् शासनाच्या गृहनिर्माण विभागास प्राप्त आदेशानूसार म्हाडाच्या मुंबई मंडळमुंबई इमारत दुरुस्ती  व पुनर्रचना मंडळकोंकण मंडळ पुणे मंडळनागपुर मंडळअमरावती मंडळऔरगांबाद  मंडळांच्या अखत्यारीत असलेल्या भाडेकरु - रहिवाशांकडून सेवाकरविद्युत करपाणीकरमालमत्ता कर आदींची थकबाकीचा भरणा दि. २४ नोव्हेंबर २०१६ पर्यंत करता येणार आहे.
या सेवेचा लाभ घेण्याकरीता आपल्याकडील आधार कार्डनिवडणुक ओळखपत्रवाहनचालक परवाना पारपत्र अथवा कोणत्याही एका ओळखपत्राची छायांकित आणि साक्षांकित प्रत सोबत आणण्याचे आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात आले आहे . महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागास प्राप्त् झालेल्या आदेशानूसार स्थानिक संस्थाच्या विविध करांचा / देय रकमांचा भरणा करण्यासाठी वित्त विभागाच्या सूचना विचारात घेऊन अटी व शर्तीच्या अधीन राहुन हा निर्णय घेण्यात आला आहे.

Friday, 28 October 2016

झोपडीतून थेट ३०० चौरस फुटाच्या सदनिकेत    

दिवाळीच्या मुहूर्तावर ६५ धारावीवासीयांचा गृहप्रवेश 

धारावी सेक्टर - ५ पुनर्विकास प्रकल्प ; म्हाडाने पात्र झोपडीधारकांना दिला पथदर्शी इमारतीतील  सदनिकांचा ताबा      

 
मुंबई , दि. २८ ऑक्टोबर २०१६ :- मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण {म्हाडा} चा घटक) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ मध्ये उभारण्यात आलेल्या १८ मजली पथदर्शी इमारतीत धारावीतील क्लस्टर जे मधील ६५  निवासी पात्र झोपडीधारकांना आज दिवाळीच्या मुहूर्तावर सदनिकांचा ताबा देण्यात आला.
वर्षानुवर्षे झोपडीत राहत असलेल्या या झोपडीधारकांना व त्यांच्या कुटुंबियांना आज थेट ३०० चौरस फुट चटई क्षेत्रफळाच्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त सदनिकेचा ताबा मिळाल्यानंतर गृहस्वप्नपूर्तीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासणाऱ्या "म्हाडा" ने या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवनमान  उंचावण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य, कौतुकास्पद, स्मरणीय असल्याची भावना यावेळी  लाभार्थ्यांनी व्यक्त केली.          
"म्हाडा"तर्फे धारावीत उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सुभाष लाखे, सहमुख्य अधिकारी श्री. चंद्रकांत डांगे, कार्यकारी अभियंता श्री. एन. एन. चांदेरे आदींच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची चावी व ताबा पत्राचे वाटप करण्यात आले.      
सदर इमारतीत ३०० चौरस फुटाच्या (कार्पेट) ३५८ सदनिका आहेत. मे- २०१६ मध्ये २६६ पात्र निवासी झोपडीधारकांना  पुनर्वसन सदनिकेचा ताबा देण्यात आला आहे. दि. १८ ऑक्टोबर २०१६ रोजी क्लस्टर जे मधील ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना चिट्ठी पद्धतीने सोडत काढून सदनिकांचे वितरणपत्र देण्याबरोबरच पात्र झोपडीधारकांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका द्यावी, याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपमुख्य अधिकारी श्री. के. व्ही. वळवी, उपमुख्य अधिकारी श्री. टी. पी. राठोड, उपमुख्य अधिकारी श्रीमती  विराज श्रीमती  विराज मढवी, जनसंपर्क अधिकारी श्री. हेमंत पाटील उपस्थित होते. उपसमाज विकास अधिकारी श्री. यु. एस. भिसे यांनी सूत्रसंचालन केले.
---
लाभार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावना

घराचे स्वप्न अखेर पूर्ण  
कोल्हापूर जिल्ह्यातील भीमा कोरेगाव हे आमचे मूळ गाव. २५ वर्षांपूर्वी रोजगारानिमित्त पतीसमवेत मुंबईला आलो. धारावीतील दहा बाय बाराच्या झोपडीत निवारा शोधला. अनेक वर्ष खडतर जीवन जगल्यानंतर आज मोठ्या, व सर्वसुविधांनी युक्त पक्क्या घरात आलो आहोत. घराचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. म्हाडाचे आभार.    
- श्रीमती शालन रतन गाडेकर                                  
----

चावी भेटली आता खात्री पटली  
माझा जन्म मुंबईचा.. धारावीत सुमारे २२ वर्षांपासून वास्तव्यास आहे. माझे पती,  मुलगा, मुलगी असे कुटुंब असून रोजगारासाठी एका क्लिनिकमध्ये साफसफाईचे तसेच धुणी भांडीचे कामही करते. महिन्याला सुमारे ५ हजार रुपये पोटापाण्यापुरता मिळतात. अशा परिस्थितीत घराचे स्वप्न दुरापास्त होते. मात्र, म्हाडातर्फे तुम्हाला घर मिळणार असे अनेक दिवसांपासून ऐकत होते. आज हातात चावी मिळाली प्रत्यक्ष घरात आले आणि खात्री पटली. खूप खूप आनंद झाला.                              
- श्रीमती मंगला मारुती पवार

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ मध्ये उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीतील सदनिकेचे ताबा पत्र व चावी श्रीमती मंगला मारुती पवार यांना देतांना मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सुभाष लाखे. समवेत  सहमुख्य अधिकारी श्री. चंद्रकांत डांगे, कार्यकारी अभियंता श्री. एन. एन. चांदेरे, उपमुख्य अधिकारी श्री. के. व्ही. वळवी आदी.




मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ मध्ये उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीतील  सदनिकेचे ताबा पत्र व चावी श्री. गणपत हरी डावळ     यांना देतांना मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सुभाष लाखे. समवेत  सहमुख्य अधिकारी श्री. चंद्रकांत डांगे, कार्यकारी अभियंता श्री. एन. एन. चांदेरे, उपमुख्य अधिकारी श्री. टी. पी. राठोड आदी. 

Wednesday, 26 October 2016

म्हाडाची ६५ धारावीवासीयांना दिवाळी भेट

धारावी सेक्टर - ५ पुनर्विकास प्रकल्पातील पथदर्शी इमारतीत शुक्रवारी देणार सदनिकांचा ताबा  

मुंबई , दि. २६ ऑक्टोबर २०१६ :- मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण {म्हाडा} चा घटक) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ चा पुनर्विकास केला जात आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत "म्हाडा"तर्फे धारावीत उभारण्यात आलेल्या १८ मजली पथदर्शी इमारतीत क्लस्टर जे मधील ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना दिवाळीच्या मुहूर्तावर शुक्रवार, दि. २८ ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी अकरा वाजता  सदनिकांचा ताबा दिला जाणार आहे.
"म्हाडा"तर्फे धारावीत उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीच्या प्रांगणात  हा कार्यक्रम होणार आहे.  सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासणारी "म्हाडा" सर्वसामान्य नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्याकरिता सतत प्रयत्नशील आहे. या माध्यमातून पात्र झोपडीधारकांना दिवाळीच्या मुहूर्तावर हक्काच्या घरात प्रवेश देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न म्हाडातर्फे केला जाणार आहे. दि. १८ ऑक्टोबर २०१६ रोजी क्लस्टर जे मधील ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना चिट्ठी पद्धतीने सोडत काढून सदनिकांचे वितरणपत्र देण्याबरोबरच पात्र झोपडीधारकांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका द्यावी, याबाबतचा निर्णय घेण्यात आला.  सदर इमारतीत ३०० चौरस फुटाच्या (कार्पेट) ३५८ सदनिका आहेत. मे- २०१६ मध्ये २६६ पात्र निवासी झोपडीधारकांना  पुनर्वसन सदनिकेचा ताबा देण्यात आला. 

Tuesday, 18 October 2016

धारावी सेक्टर - ५ पुनर्विकास प्रकल्प
६७ झोपडीधारकांना सदनिकांचे वितरणपत्र
मुंबई , दि. १८ ऑक्टोबर २०१६ :- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) चा घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ चा पुनर्विकास केला जात आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत "म्हाडा"तर्फे धारावीत उभारण्यात आलेल्या १८ मजली पथदर्शी इमारतीत क्लस्टर जे मधील ६७ निवासी पात्र झोपडीधारकांना आज चिट्ठी पद्धतीने सोडत काढून सदनिकांचे वितरणपत्र देण्यात आले.
"म्हाडा"तर्फे धारावीत उभारण्यात आलेल्या १८ मजली पथदर्शी इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सहमुख्य अधिकारी श्री. चंद्रकांत डांगे, उपमुख्य अधिकारी श्री. के. व्ही. वळवी, उपमुख्य अधिकारी श्री. टी. पी. राठोड, उपमुख्य अधिकारी श्रीमती विराज मढवी, सहकार अधिकारी श्री. जाधव आदी उपस्थित होते.
पात्र झोपडीधारकांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका द्यावी, याबाबतचा निर्णय आज झाला. ६७ पात्र झोपडीधारकांना कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सदनिकेचा ताबा दिला जाणार आहे. सदर इमारतीत ३०० चौरस फुटाच्या (कार्पेट) ३५८ सदनिका आहेत. क्लस्टर जे मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शताब्दी नगर या वसाहतीतील झोपडीधारकांची पात्र-अपात्र बाबतची प्रक्रिया राबविल्यानंतर मे- २०१६ मध्ये २६६ पात्र निवासी झोपडीधारकांना पुनर्वसन सदनिकेचा ताबा देण्यात आला आहे.

Thursday, 6 October 2016

दिनांक ३ ऑकटोबर २०१६ रोजी ' जागतिक निवारा दिन ' यानिमित्तानं निवारा दिनाचं महत्त्वं, जागतिक संदर्भात भारतातली आणि महाराष्ट्रातली निवाऱ्याची स्थिती, तसंच महानगरी मुंबापूरीतलं चित्र आणि त्यातील सरकारचा सहभाग, आदी मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात 'म्हाडा'चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संभाजी झेंडे (भा. प्र. से.)  दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील साडेनऊच्या बातमीपत्रात सहभागी झाले.

Wednesday, 5 October 2016

म्हाडा पुणे मंडळाच्या सदनिका सोडतीकरिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ 


म्हाडा पुणे मंडळाच्या सदनिका सोडतीकरिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ 

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळातर्फे २५०३ सदनिका व ६७ भूखंडाच्या सोडतीकरिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी https://mhada.maharashtra.gov.in  किंवा https://lottery.mhada.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्या.      




Friday, 19 August 2016



म्हाडातील लोकसेवा सुविधा केंद्राची यशस्वी वर्षपूर्ती 




Thursday, 11 August 2016

दि. ११ ऑगस्ट २०१६ च्या पुढारी (मुंबई) मध्ये प्रकाशित म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीची  बातमी.  




दि. ११ ऑगस्ट २०१६ च्या द एशियन एज (मुंबई) मध्ये प्रकाशित म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीची  बातमी.   \




दि. ११ ऑगस्ट २०१६ च्या सामना  (मुंबई) मध्ये प्रकाशित म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीची  बातमी.  




दि. ११ ऑगस्ट २०१६ च्या लोकमत (मुंबई) मध्ये प्रकाशित म्हाडाच्या मुंबई मंडळाची बातमी.


Monday, 8 August 2016

मुंबई मंडळाची सोडत १० ऑगस्ट रोजी 



Friday, 15 July 2016

प्रधानमंत्री आवास योजना सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे (शहरी) या योजनेअंतर्गत घरांच्या मागणीबाबत बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवली, वसई - विरार, मीरा - भायंदर, भिवंडी - निजामपूर, उल्हासनगर, नवी मुंबई या महानगरपालिकांच्या तसेच पेन, पनवेल, कर्जत, खोपोली, बदलापूर, अंबरनाथ या नगरपालिकांच्या हद्दीत सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाबाबत तयार केलेली
जाहिरात.


प्रधानमंत्री आवास योजना सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे (शहरी) या योजनेअंतर्गत घरांच्या मागणीबाबत बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवली, वसई - विरार, मीरा - भायंदर, भिवंडी - निजामपूर, उल्हासनगर, नवी मुंबई या महानगरपालिकांच्या तसेच पेन, पनवेल, कर्जत, खोपोली, बदलापूर, अंबरनाथ या नगरपालिकांच्या हद्दीत सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाबाबत तयार केलेली दृक्श्राव्य जाहिरात.  



Thursday, 5 May 2016


धारावीतील २५५ निवासी झोपडीधारकांची गृहस्वप्नपूर्ती   






Monday, 18 April 2016

म्हाडातील महिला अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी एक वर्षाची बाल संगोपन रजा    


Wednesday, 6 April 2016

कोंकण मंडळ सदनिका सोडत - २०१६ 
 ११ एप्रिलपासून पुढील कार्यवाहीला होणार प्रारंभ  




Monday, 28 March 2016


म्हाडाचा सन २०१६-२०१७ चा अर्थसंकल्प 




Wednesday, 17 February 2016


धारावी सेक्टर ५ पुनर्विकास प्रकल्पातील झोपडीधारकांना सदनिकांचे वितरणपत्र प्रदान.