कोंकण मंडळ सदनिका सोडत-२०१८
यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी २८ जानेवारीपासून विशेष मोहीम
मुंबई,
दि. १९ जानेवारी, २०१९ :- कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन
२०१८ मध्ये काढण्यात आलेल्या ९०१८ सदनिका सोडतीतील यशस्वी अर्जदारांच्या
पात्रता निश्चितीकरिता
आवश्यक पुरावे/कागदपत्रे सादर करण्यासाठी
दि. २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत विशेष मोहीम
राबविण्यात येणार आहे. वांद्रे पूर्व येथील
गृहनिर्माण भवनाच्या प्रांगणात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दररोज
५०० यशस्वी अर्जदारांची पात्रता निश्चित केली जाणार आहे. सोडतीतील संकेत
क्रमांक २७४ विरार बोळींज (अल्प उत्पन्न गट) व संकेत क्रमांक २७६ बाळकूम
ठाणे (मध्यम उत्पन्न गट) या योजनेतील सर्व यशस्वी अर्जदार तसेच
टप्पा क्रमांक १ मध्ये राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ज्या यशस्वी
अर्जदारांना सहभाग घेता आला नाही अशा अर्जदारांनी पात्रता निश्चित
करण्यासाठी या विशेष मोहीमेत सहभागी होऊन आवश्यक कागदपत्रे / पुरावे सादर
करावीत, असे आवाहन कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी
केले आहे. या विशेष मोहिमेत सहभागी होण्यासाठी दि. २१ जानेवारी
ते ८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वांद्रे
पूर्व येथील म्हाडा कार्यालयातील मित्र कक्षातून टोकन दिले जाणार आहे. या
टोकन क्रमांकाबरोबर अर्जदारास आवश्यक नमुना पत्रे व चेक लिस्ट दिली जाणार
आहे. टोकन मिळवण्यासाठी अर्जदाराने सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जाची प्रत व
स्वतःचे ओळखपत्र सोबत आणावे. पात्रतेसाठी आवश्यक नमुना पत्रे व चेक लिस्ट
म्हाडाचे संकेतस्थळ https://mhada.gov.in
वरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत अर्जदाराने
पात्रतेसंबंधी लागणारे कागदपत्रे / पुरावे सादर न केल्यास भविष्यात यशस्वी
अर्जदाराला मंडळातर्फे पुन्हा संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही व
संबंधितांचा अर्ज रद्द करून नियमानुसार प्रतीक्षा यादी कार्यान्वित
करण्याची कार्यवाही करण्यात येईल.